Parbhani – जिंतूर येथे इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन
जिंतूर (जि. परभणी) – येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करीत असताना शनिवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नागसेन भेरजे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रदीपराव देशमुख,युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राम देशमुख,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुलेमान सिद्दिकी, ज्ञानेश्वर राठोड, सुरज कनकुटे, अशनाल सिद्दिकी, पिंकल खंदारे, दीपक ढगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
या आंदोलनात शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करीत पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढ व महागाईचा निषेध करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशाहीन नेतृत्वामुळे देश एक अभूतपूर्व संकटाचा सामना करीत आहे त्यामुळे देशाची मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशी सूचना खा राहुलजी गांधी यांनी सरकारला केली होती परंतु हा जवाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याच काम देशातील मोदी सरकारने केल आहे या बाबतीत आंदोलन करण्यात आले …
