fbpx
Saturday, April 27, 2024
BLOGLatest News

बार्टी संस्थेचा गाभा असणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्रांना लागली उतरती कळा…

गेल्या काही वर्षांपासून बार्टी या स्वायत्त संस्थेने एक आदर्श निर्माण केला होता. लाखो अनूसुचीत जातीचे विद्यार्थी बार्टीकडून एमपीएससी, युपीएससी आणि अायबीपीएस अशा विविध परिक्षांसाठीच्या कोर्ससच्या माध्यमातून कोचिंग व प्रशिक्षण घेत असत आणि अाताही घेतातच. हे शिक्षण घेत असताना पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळायचे. विद्यार्थी या पुर्व परीक्षांच्या जाहीरती कधी निघतात याची अातुरतेने वाट पाहत असत. कारण स्पर्धा परीक्षाच्या भरभराटीच्या काळात ही संस्था विद्यार्थ्यांच्या अधिकारी होण्याचा स्वप्नांना पंख आणि अर्थिक बळ देखील देत होती.

मात्र सध्या तसं होताना दिसत नाही. यामागे राजकीय, प्रशासकीय उदासिनता हा एक मोठा भाग. त्याचबरोबर दुसरे म्हणजे सामाजिक चळवळीतील मंडळीचे याकडे झालेले दुर्लक्ष. आशा सगळ्या उदासीनतेमुळे बार्टी संदर्भातील विषय चव्हाटयावर येत नाहीत, आणि अाले तरी त्यावर फारसा चर्चाविनमय होत नाही. अशावेळी विद्यार्थीही अापले हक्क व कर्तव्याच्या जाणीवेपासुन बर्‍याच अंशी दूर गेल्याचे दिसते. ते देखील आपल्या हक्कांसाठी सांविधानिक मार्गाने व्यापक आंदोलन उभा करत नाहीत. यांचा पुरेपुर फायदा या संस्था व शासनकर्ते घेत असतात.

या संस्थेत सध्या चालू तरी काय आहे ? लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचं अाशास्थान असणारे बार्टी प्रशिक्षण व संशोधन केंद्रातील स्पर्धा परीक्षा विभाग डगमगीला का अालाय ?

2019-2020 या वर्ष बजेट 250 कोटी रु.मंजूर केले मात्र प्रत्यक्षात मिळाले फक्त 50 कोटीच. बाकीचे करोनाच्या नावाखाली अजूनही दिलेले नाही.

सन 2019-20 या वर्षाच्या एमपीएससी विद्यार्थ्यांना अजुनही विदयावेतन दिले नाहीये. ऑनलाईन उपस्थितीत ग्राहय धरुन विद्यार्थ्यांना वेतन देण्यात यावे असे शासनाचे परीपञक असतानाही रक्कम विदयार्थींना का मिळत नाही?

या विद्यावेतनाच्या भरवशावर औरंगबाद व नागपुर या ठिकाणी जवळपास 400 विद्यार्थ्यांवर तर उपासमारीची वेळ आली अाहे, करणार तरी काय? संबोधी अकादमी कोचिंग, औरंगाबाद यांनी कर्मचारी अभावाचे कारण देत माहिती देणे टाळले. नागपुरच्या प्रशिक्षण केंद्राची माहीती देखील अपूर्ण अाहे. या दोन्ही केंद्राच्या गैरव्यवहार प्रकरणी समिती नेमली होती त्याचे पुढे काय झाले याचाही पत्ता नाही. या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक काय आहे ? त्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय…

अशीच अवस्था युपीएससी विद्यार्थ्यांची अाहे. सन 2015 पासून दरवर्षी दिल्ली येथे 200 विद्यार्थ्यांना क्लासेस साठी पाठवतात. त्यांचा सर्व खर्च बार्टी करते. यावर्षी ही योजना बंद आहे. कारण दिले जातेय की करोनाच्या नावाखाली बजेट नाहीये. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत असे म्हणतात आणि लेक्चरचा व्हिडोओ युट्युब टाकयचा काम करतात.ते देखील अाता बंद केले आहे.

अायबीपीएस पूर्व परीक्षेच्या कोंचिग बाबतीतही असाच प्रकार आहे, त्यामुळे मूळ उद्देशापासुनच बार्टी भरकटत चालली काय अशा प्रश्न पडतो. ज्या संस्थेचा हेतूच हा होता की जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन बार्टीच्या सहकार्याने अनेक गुणवंत विदयार्थी अधिकारी झाले देखील. पण अाता मातर या व्यवस्थेला उतरती कळा लागलीये.

डॉ.बाबासाहेब अांबेडकर एकदा म्हणले होते- “जा घराच्या भिंतींवर लिहुन ठेवा माझी जमात शासनकर्ता झाली पाहीजे.” बाबासाहेबांच्या या विचारांचा विसर बार्टीला पडतोय ही खेदजनक गोष्ट आहे…ही सर्वासाठी नक्कीच आत्मचिंतन करण्याची वेळ अाहे.

– कुलदीप आंबेकर
अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading