गुंठेवारी नियमितिकरणाची प्रक्रिया लवकर सुरू करा – चंद्रकांत पाटील

पुणे :  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमितीकरण करणेबाबतचा निर्णय 6 जानेवारी 2021 रोजी जाहीर केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात अधिवेशनात यासंबंधीचा कायदा ही अस्तित्वात आला. नंतर स्थायी समिती ने देखील याबाबत चा निर्णय जाहीर केला. मात्र अद्याप प्रशासनाने गुंठेवारी नियमितिकरणाची प्रक्रिया सुरु केली नसल्याने ती लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
याबाबत पाटील यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, राजेंद्र राऊत उपस्थित होते.
पाटील म्हणाले, गुंठेवारी नियमितिकरण रखडल्यामुळे सदर निर्णयाचा लाभ सर्वसामान्यांना  मिळालेला नाही. एकीकडे कर्ज काढून घेतलेल्या घराचे हप्ते सुरु असून काहींना घराचा ताबा ही  मिळालेला नाही तर काहींचे मंजूर गृहकर्जाचे वितरण (disbursement) होत नसल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे गुंठेवारी नियमितिकरणाची प्रक्रिया लवकर सुरू करावी.
यावर आयुक्त विक्रमकुमार यांनी गुंठेवारी नियमितिकरणस अनुकूलता दर्शविली. मात्र उच्च न्यायालयाच्या 2017 मधील एका निकालाचा संदर्भ देत सरसकट गुंठेवारी नियमितिकरणात या आदेशाचा अडसर असून त्याबाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जी बांधकामे मनपाच्या डी सी रुल नुसार नियमितिकरणास पात्र आहेत त्यांची प्रक्रिया त्वरित सुरु करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: