Pune – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक डेंगळे पूल शिवाजीनगर  येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय आहे. या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष प्रशात जगताप, आमदार चेतन तुपे, अंकुश काकडे पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ व शहरातील पक्षाचे कार्यकते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण सध्याच्या वातावारना मुळे आले नाहीत. महाराष्ट्र ल्या सगळया जनतेला लस मिळाली पाहिजे या साठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नियोजन करत आहेत येणाऱ्या पुढिल  काळात पक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनी पक्ष कसा वाढवायचा यावर भर दिला पाहिजे दर आठवड्याला पक्षाची मिटिंग ही घेतली पाहिजे शहरात कुठली विकास कामे होत आहेत याचा आढावा या मिटिंग मध्ये घेतला पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन कार्यालय हे जनतेच्या सेवेत आले आहे याचा मला खूप आनंद होत आहे पक्षात तरुण  पिढीला संधी दिली पाहिजे पक्ष या पुढच्या काळात कसा वाढेल व कसा मजबूत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: