मुळशीतील अजय उर्फ़ आबा साठे खून प्रकरणात आराेपीला जामीन मंजूर

पुणे – अजय उर्फ आबा राघू साठे राहणार वाळेन, तालुक़ा मुळशी यांचा दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी त्यांच्या कुटुंबीयासमाेरच गोळी झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणा मधील आराेपी सुनील पांडुरंग पडवळ याची पुणे सत्र न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ०१ मार्च २०२१ रोजी आराेपी बापू जोरी हा वाळेन गावातील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी पोकलेन मशीन च्या साहाय्याने खोदकाम करत होता त्यामुळे मयत साठे यांच्या गाईंना ओढ्यावर जाण्यास अडचण होत होती. याच कारणावरून साठे व जोरी ह्यांच्यामध्ये दुपारी ३.१५ च्या सुमारास वाद झाला होता. त्यानंतर मयत अजय उर्फ आबा, त्याची पत्नी मनीषा व वडील राघू ३.३० वाजता त्यांच्या गोठ्याकडे जात असताना आराेपी बापू जोरी याने अजय याच्या छातीवर गोळी झाडली.सदर खून प्रकरणात सुनील पांडुरंग पडवळ रा. चांदीवली, मुळशी याला खुनात वापरलेली बंदूक पुरविल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती.

सदर खून खटल्यात आरोपी नामे सुनील पांडुरंग पडवळ यास पुणे सत्र न्यायालयाने जामीनवर सोडण्याचे आदेश दिले आहे. पडवळ यांच्यातर्फे न्यायालयात ॲड. मयूर दोडके यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पडवळ याने बंदूक दिली नसून ती एका तिर्हाइत कातकरी व्यक्तीने बंदूक दिल्याचे ॲड. दोडके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व तो इसम मयत पावल्याने पडवळ यास पोलिसांनी अटक केल्याचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला.सदर प्रकरणात ॲड. समीर जोरी व ॲड. रितेश गदादे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: