कोरोना नियंत्रण साठी पुणे महापालिका आता सांडपाण्याची तपासणी करणार

पुणे – कोरोना विरोधी लढ्यात पुणे महानगर पालिका विविध उपाययोजना राबवत असून महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या उपाय योजना मुळे रुग्ण संख्या देखील कमी होताना दिसत आहे. कोरोना नियंत्रण साठी पुणे पालिका कडून आता सांडपाण्याची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जल शुद्धीकरण केंद्रामध्ये निरनिराळ्या भागातून जमा होणाऱ्या सांडपाण्याचे एनसीएल ने नमुने घेऊन त्याचे परीक्षण केल्यानंतर त्या सांडपाण्यामध्ये किती प्रमाणात कोरोनाचे विषाणू आढळून येतात ,त्याचे विश्लेषण तपासणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेमार्फत करण्यात आली आहे .या विश्लेषण तपासणी मुळे कोणत्या भागामध्ये कोरोना विषाणू चे प्रमाण किती आहे .याची माहिती त्वरित कळणार आहे असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: