नगरसेवक अजय खेडेकर यांच्याकडुन आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के दरात एसटी कार्डचे वाटप

पुणे – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखाचा आरोग्यविमा मोफतचे वाटप भाजप नगरसेवक अजय खेडेकर यांच्या मार्फत आयुष्यमान भारत कार्ड व ज्येष्ठ लोकांना 50 टक्के दरात एसटी कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेवक अजय खेडेकर म्हणाले की, शासनाच्या भरपूर योजना असून लोकांना त्या माहीत नसतात त्यामुळे अनेक योजना केंद्राच्या व राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तत्पर असणार आहे
तसेच कोरोनाच्या काळात लोक अतिशय बिकट अवस्थेतून जात असून त्यांना धान्य किट देणे गरजेचे असून ती जबाबदारी आम्ही पार पाडली असून लोकांनी देखील जे लोक रेशनिंग घेत नाहीत आशा लोकांनी ते गरिबांना द्यावे असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रभागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत वैयक्तिक किंवा शासनाची मदत देण्याचं काम त्यांच्यामार्फत होत असून त्यांच कौतुक देखील यावेळी केलं.
विमीन लोदा याच्या वडिलांनी कोरोनामध्ये जीव गमावला, त्याला पोलीस होण्याची इच्छा असून ती जबाबदारी आप्पासाहेब खेडेकर फौंडेशन तर्फे घेण्यात आली अशी देखील माहिती खेडेकर यांनी दिली

यावेळी बोलताना नगरसेवक धीरज घाटे म्हणाले, शासनाच्या सर्वच योजनांचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व अशी ओळख अजय आप्पा खेडेकर यांची असून साहजिकच त्यांनी सर्वात ज्यास्त योजना आजपर्यंत आपल्या प्रभागात पोहचविल्या आहेत.

यावेळी कसबा मतदार संघ युवा मोर्चा अध्यक्ष हर्षद पवार ,विजय कोटवळे, नंदू झेंडे, विठ्ठल पवार ,आण्णा उत्तरकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला

Leave a Reply

%d bloggers like this: