Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

डॉ. आशुतोष रारावीकर आणि डॉ. ज्योती रहाळकर यांना 
रंगत-संगत प्रतिष्ठानचा ‘काव्य प्रतिभा’ पुरस्कार जाहीर

पुणे :- रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा काव्यप्रतिभा पुरस्कार यंदा प्रख्यात अर्थतज्ज्ञ, लेखक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील संचालक डॉ. आशुतोष रारावीकर आणि आयुर्वेद स्वास्थ्य सल्लागार कवयित्री डॉ. ज्योती रहाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविली आहे. 
शनिवार दिनांक ५ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजता,  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते छोटेखानी घरगुती समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे. 
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांपैकी ‘काव्य प्रतिभा’ हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. सन्मानपत्र, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असेही रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading