Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आमदार राजाभाऊ राऊत यांचा राष्ट्रीय कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव

उस्मानाबाद – राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारतचे राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय उद्योग मंत्री भारत सरकार अल्ताफ सय्यद यांच्या माध्यमातून आमदार राजाभाऊ विठ्ठल राऊत बार्शी विधानसभा यांना राष्ट्रीय कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय मानव अधिकार निवारण भारत व बळीराजा शेतकरी संघटनेच्या सर्व टीमच्या वतीने हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला, असे राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच प्रगतशील शेतकरी गाडे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश ढगे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नागेश कदम, परांडा तालुका अध्यक्ष सतीश गणगे, संघटक कल्याण उर्फ मरीबा गणगे, ग्रामपंचायत सदस्य आसू श्रावण गणगे, संघटक भीमराव जाधव, फुलचंद गायकवाड, सचिव औदुबर ठोंगे यांनाही रमेश गणगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मानव अधिकार ही संघटना अनेक गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र झटत आहे असे राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांनी यावेळी बोलतांना सांगितले जर कुठलीही मदत लागल्यास राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे तुमच्या बरोबर असतील असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading