Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

प्रा. मिलिंद जोशी, अभिनेत्री श्रेया बुगडे आणि पराग करंदीकर यांना आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

११ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे स्वरूप आहे

सासवड :आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड याचे वतीने दरवर्षी देण्यात येणारे साहित्य ,पत्रकारिता ,व कलाकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .

साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून कार्य करीत असलेले लेखक ,संपादक ,वक्ते प्रा. मिलींद जोशी याना या वर्षीचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे .प्रा. जोशी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग भरती विद्यापीठ पुणे येथे प्राध्यापक आहेत प्रा. जोशी याचे कथासंग्रह ,विनोदी लेखन ,चरित्र लेखन अशा क्षेत्रात लेखन केले आहे . जून २०११ मध्ये फलटण येथे झालेल्या आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या प्राचार्य शिवाजीराव भोसले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली होती . त्यांनी पुणे येथील वसंत व्याख्यान माला व अनेक ठिकाणी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद या विषयावर व्याख्याने दिली आहेत साहित्य निर्मिती साठी गदिमा प्रतिष्ठान व अन्य संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

महाराष्ट्र टाइम्स चे संपादक पराग करंदीकर याना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे .प्राग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व प्रतिथयश पत्रकार असून महाराष्ट्र टाइम्स , सकाळ सारख्या नामांकित व पुणे ,मुबई सारख्या महानगरातील नागरिकाचे मतप्रवाह ठरिवणाऱ्या वृत्तपत्रासाठी वृत्त संकलन करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव जमविलेला आहे आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाचा व अचूक माहिती संकलनाचा सुरेख संगम करीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे .

अभनेत्री श्रेया बुगडे यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे . श्रेया बुगडे या भारतीय नाट्य ,व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहेत . चला हवा येऊ द्या , या लोकप्रिय कार्यक्रमात पहिल्या पासून एकमेव स्त्री कलाकार आहेत . फू बाई फू या कार्यक्रमातही त्याचा सहभाग होता .

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे वतीने १९९१ साला पासून हे पुरस्कार दिले जातात . ११ हजार रुपये रोख ,मानपत्र ,गौरवचिन्ह असे पुरस्कराचे स्वरूप आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ऍड अण्णासाहेब खाडे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली . १३ जून या आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनी पुरस्कार वितरण होते मात्र यावर्षी कोरोना महामारी संकटामुळे पुरस्कारवितरण तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे . साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान ,उपाध्यक्ष बंडूकाका जगताप पत्रकार परिषदेस उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading