Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेचा जामीन मंजूर

मुंबई, दि. 6 – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्य़कर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर बराच काळ पोलिसांना याप्रकरणात काहीही ठोस पुरावे मिळाले नव्हते. अखेर 25 मे 2019 रोजी पोलिसांनी विक्रम भावे यांना अटक केली होती. सीबीआयने त्याच्यावर मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवला होता. तेव्हापासून विक्रम भावे तुरुंगात होते.

मात्र, आज उच्च न्यायालयाने विक्रम भावे यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर विक्रम भावे यांना साधारण आठवडाभर पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे.

त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांसाठी त्यांना आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा अशाप्रकारे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. तसेच विक्रम भावे यांना न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading