कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तातडीने डॅशबोर्ड कार्यान्वित करावा; राजीव गांधी स्मारक समितीची विभागीय आयुक्तांकडे मागणी


पुणे दि ४ – कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी पर्यायाने रूग्णांना तातडीने बेड ऊपलब्ध करून देणेसाठीच् Real_Time_Dash_Board कार्यरत होणे गरजेचे आहे…! “लसीकरण नोंदणी, प्रवेश प्रक्रिया, ट्रॅव्हल बुकिंग” इ. सर्व काही ॲानलाईन होत असतांना व टेक्नॅालॅाजी ऊपलब्ध असतांना, ‘आय टी हब’ असलेल्या पुणे शहरात हा डॅश बोर्ड का कार्यान्वीत होत नाही..? पुणे मनपा अखत्यारीतील सुमारे ११ हजार ५०० बेड्स च्या ऊपलब्धतेची अद्यावत माहीती – रियल टाईम डॅश-बोर्ड’ मा विभागीय आयुक्तांनी आपल्या अखत्यारीत घ्यावा व (मुंबईचे धर्तीवर) पुणे शहरांतील कोविड बेड्स ची अद्यावत माहीती देणाऱ्या डॅशबोर्ड ची यंत्रणा ऊभी करावी, या मागणी ‘*राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे विभागीय  आयुक्त सौरभ राव  यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


याप्रसंगी राजीव गांधी स्मारक समिती अध्यक्ष, (काँग्रेस प्रवक्ते) गोपाळदादा  तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, डॉ.  जयश्री तोडकर, मुकुंद किर्दत, IMA पुणे अध्यक्ष डॉ. बी. एल देशमूख, सर्वश्री मा नगरसेवक प्रशांत बधे, डॅा अभिजीत मोरे , मा नगरसेवक रविंद्र माळवदकर व स्थायी समिती माजी अध्यक्ष शाम देशपांडे, शहर काँग्रेस ऊपाध्यक्ष सुर्यकांत मारणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: