बडवे उद्योग समूहाचे संस्थापक शंकर प्रभाकर बडवे यांचे निधन

पुणे: बडवे उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष शंकर प्रभाकर बडवे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. बडवे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांचे ते वडील, तर संचालिका सुप्रिया बडवे यांचे ते सासरे होत.
शंकर बडवे यांचा जन्म जोधपुर (राजस्थान) येथे १९३८ मध्ये झाला. वडील प्रभाकर बडवे भारतीय सेनेमध्ये वैद्यकीय विभागात कार्यरत होते. शंकर बडवे यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केल्यानंतर बजाज उद्योग समूहात नोकरी केली. ३७ वर्ष नोकरी केल्यानंतर बजाज तीन चाकी कारखान्याचे प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
१९८७ मध्ये त्यांनी आपला मोठा मुलगा श्रीकांत शंकर बडवे यांच्या मदतीने बडवे उद्योग समूहाची स्थापना केली. आपल्या अथक परिश्रमातून बडवे उद्योग समूह आज पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. बडवे उद्योग समूह आज भारतभरात एक नामांकित उद्योग समूह आहे. बजाज ऑटो, होंडा मोटर्स, हीरो, मोटोकॉर्प, महिंद्रा समूह यांसारख्या भारतासह जगातील काही नामांकित कंपन्यांना बडवे उद्योग समूह पुरवठादार म्हणून कार्यरत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: