सुरक्षा किट देऊन पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक

पुणे : लॉकडाऊन असताना रस्त्यावर उतरुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणा-या पोलीस बांधवांना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरतर्फे सुरक्षा किट व अल्पोपहार देण्यात आला. पुणे शहरातील प्रमुख ८ चौकांतील ४०० पोलिसांना ही कृतज्ञता भेट देऊन त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक कार्यकर्त्यांनी केले.

ओबीसी मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी निलेश घोडके, ओंकार माळवदकर, शंतनु नारके, यशोधन आखाडे, अमोल पांडे, दिलीप पवार, पंकज गिरमे, बंडू कचरे, रोहन कोद्रे, दिनेश रासकर, प्रतीक खताळ आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
बालगंधर्व चौक, खंडूजीबाबा चौक, टिळक (अलका टॉकिज) चौक, विश्रामबागवाडा चौक, सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, पोलीस ग्राऊंड स्टेशन याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ही भेट देण्यात आली. याशिवाय काही पोलीस चौक्यांमध्ये देखील पोलिसांना देण्यात आले.

योगेश पिंगळे म्हणाले, आठवडयातील पाच दिवस ठराविक वेळेत आणि शनिवार-रविवार कडक निर्बंध अशी नियमावली असताना पोलीस बांधव मात्र रस्त्यावर अहोरात्र बंदोबस्तासाठी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सर्वोतोपरी सहकार्य करीत आहेत. खाकीतील माणूस यानिमित्ताने सामान्यांना पहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: