Saturday, May 30, 2026
PUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रुकारी यांची निवड

पुणे, दि. १४ – कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी २०२१-२२ या वर्षाकरीता सुनील रुकारी यांची निवड झाली. तर कार्यकारी विश्वस्तपदी डॉ.पराग काळकर, खजिनदारपदी राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उप उत्सवप्रमुख म्हणून अ‍ॅड.रजनी उकरंडे यांची नियुक्ती झाली आहे.  

यासोबतच अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे, अ‍ॅड.प्रताप परदेशी आणि महेंद्र पिसाळ हे विश्वस्तपदी असणार आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील रुकारी हे बँकिंग क्षेत्रातील विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष असून त्यांनी अनेक संस्थांवर काम केले आहे. डॉ.पराग काळकर हे शैक्षणिक क्षेत्रात, राजू बलकवडे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विधी क्षेत्रात अ‍ॅड.रजनी उकरंडे व अक्षय हलवाई हे व्यावसायिक आहेत. 

अ‍ॅड.शिवराज कदम-जहागिरदार, युवराज गाडवे, अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी यापूर्वी दत्तमंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तर, महेंद्र पिसाळ हे पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. नवीन कार्यकारी मंडळाची पहिली सभा झाल्यानंतर अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन घेत नवनियुक्त विश्वस्तांनी आरती देखील केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय मते, विश्वास भोर, दत्तमंदिराचे माजी विश्वस्त शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. 
नवनियुक्त अध्यक्ष सुनील रुकारी म्हणाले, पुढील पाच वर्षे मंदिराच्या धार्मिक रितीरिवाजांचे पालन करीत असतानाच न्यासाच्या निधीचा अधिकाधिक विनियोग सामाजिक कार्यासाठी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading