सृष्टी चौकातील क्रीडा उद्यानास महापुरुषाचे नाव देण्याची मागणी

पिंपरी, – पिंपळे गुरव येथील सर्वे नंबर 80, 81, 82, 83, 84 मध्ये महापालिकेच्या वतीने खेळाचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानाच्या प्रवेशद्वाराला बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरसिंग आदियाल यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

सृष्टी चौकानजीकच्या जागेवर महापालिकेने खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले होते, त्याप्रमाणे या ठिकाणी क्रीडा उद्यान उभारले आहे. या या उद्यानाचे काम पूर्ण झाले असून, ते नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराला महापुरुष बिरसा मुंडा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे अमरसिंग आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, तानाजी जवळकर, राहुल काकडे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आयुक्तांनाही पत्र देण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: