भाजप सहकार आघाडीच्या  कायदेशीर सल्ला केंद्रात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण 

पुणे – भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या वतीने पुणेकरांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत कायदेशीर सल्ला केंद्र मार्फत  नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

मोफत सल्ला केंद्रामार्फेत पहिल्या दिवशी शनिवारी ३ सोसायट्या डीम्ड कन्व्हेअन्स, अतिक्रमणे, खाजगी मालमत्ता, कौटुंबिक आणि बिल्डर्स यांचे विषयी तक्रारींवर कायदेतज्ञांनी मार्गदर्शन केले. सहकार आघाडीच्या वतीने दिलेल्या हेल्पलाईन  लिंक वर एक आठवड्यात ३१ तक्रारी आल्या होत्या.

याप्रसंगी ॲड.अभय सोमण,ॲड.राजश्री दिक्षीत, सहकार आघाडी पुणे शहराध्यक्ष  सचिन दशरथ दांगट, उपाध्यक्ष किशोर चौधरी, सरचिटणीस अजित देशपांडे, चिटणीस नंदकुमार बोळे, किरण ऊभे आदि मान्यवर ऊपस्थित होते. अनेक कागदपत्रांसह आलेल्या विविध सोसायटी पदाधिकारी, वैयक्तिक अडचणींसाठी आलेल्या मंडळींनी मिळालेल्या सल्ल्याबाबत समाधान व्यक्त केले. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: