ज्येष्ठ रक्तदाते राम बांगड यांच्या १४१ व्या रक्तदानानिमित्त आंतरराज्यीय रक्तदान रविवारी

पुणे, दि. ३ – रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ रक्तदाते राम बांगड यांच्या १४१ व्या रक्तदानानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध राज्यातील रक्तदाते पुण्यात येऊन रक्तदान करणार आहेत. रविवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवन येथे शिबिराला सुरुवात होणार आहे. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आणि महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनचे विश्वस्त ईश्वर धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेला राम बांगड, अशोक राठी, प्रकाश पुंगलिया, निखिल दसवडकर उपस्थित होते. 
विविध राज्यातील रक्तदात्यांचा कार्यक्रमात सन्मान करणार येणार आहे. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. १ हजार पेक्षा अधिक रक्तदाते यावेळी रक्तदान करणार आहेत. 

निखिल दसवडकर म्हणाले, महाराष्ट्रासह काश्मिर, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील रक्तदाते शिबिरात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर,सांगली,कºहाड, सातारा, बारामती, भोर या  ठिकाणाहून रक्तदाते येऊन रक्तदान करणार आहेत. पुण्यातील १५  रक्तपेढीला रक्ताच्या पिशव्या देण्यात येणार आहेत. तसेच संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन पुण्याबाहेरील  रक्तपेढ्यांना देखील रक्त देण्यात येणार आहे. 
राम बांगड म्हणाले, मी नियमित रक्तदाता असून सन १९७६ पासून रक्तदान करीत आहेत. स्वत: रक्तदान करण्यासोबतच इतरांनी देखील रक्तदान करावे यासाठी मी जनजागृती करतो. आजपर्यंत १५ राज्ये आणि २२ जिल्हयात ५० हजार रक्तदाते यामाध्यमातून निर्माण झाले आहेत. कोविडमध्ये ९ वेळा मी प्लाझ्मादान केले असून आतापर्यंत २१ वेळा प्लेटलेटस डोनेशन केले आहे. ४०० हून अधिक कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. 
आमच्या रक्ताचे नाते या चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत गरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात रक्त दिले जाते. मागील २७ वर्षापासून ट्रस्टचे काम सुरु आहे. सध्या पुण्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून शिबीरात संकलित होणार रक्त सर्व रक्तपेढयांना देण्यात येईल.  तब्बल २०० पेक्षा अधिक पुरस्काराने बांगड यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: