fbpx
Sunday, June 2, 2024
ENTERTAINMENT

जयदीप गौरीला शिकवणार कार चालवायला

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. माईंनी गौरीचा सून म्हणून स्वीकार करुन तिला शिर्केपाटलांच्या सुनेचे सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबावरचं तिरस्काराचं सावट दूर झालंय. एकीकडे माईंनी गौरीला सून म्हणून स्वीकारलं आहे तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीचं नातंही बहरू लागलं आहे. लवकरच जयदीप गौरीला कार चालवायला देखिल शिकवणार आहे.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा प्रभू म्हणाली, ‘जयदीप-गौरी या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. जयदीप-गौरीचं नातंही दिवसेंदिवस बरहतंय. लवकरच मालिकेत एक छान ट्रॅक पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जयदीप गौरीला कार चालवायला शिकवतो. खरं सांगायचं तर मला ड्रायव्हिंग अजिबाज जमत नाही. हा सीन करताना मला जयदीप म्हणजेज मंदार जाधवने कार शिकवली. सुरुवातीला खूपच भीती वाटत होती. मात्र मंदारचं मार्गदर्शन आणि संपूर्ण टीमच्या पाठिंब्यामुळे मी हा सीन करु शकले.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading