भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्षपदी भिमराव साठे यांची निवड


पुणे – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्च्या च्या पुणे शहराध्यक्ष पदी भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते भिमराव साठे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्यांना निवडीचे पत्र भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि महापालिका सभागृह नेते धीरज घाटे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
पुणे शहरात झोपडपट्ट्यांची संख्या जास्त आहे .त्यासाठी आपण काम करून दलीत ,उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणार असल्याचे निवडीनंतर भिमराव साठे यांनी सांगितले आहे.साठे हे गेल्या 20 वर्षापासून भाजपा काम करीत असून ,तळागाळातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते सतत काम करीत आहेत .त्यांच्या या कामाची दखल घेऊन च पक्षाने त्यांना आता महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे .पुणे महापालिकेत त्यांच्या पत्नी वर्षा साठे या नगरसेविका आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: