प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट भेट
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने प्रथेप्रमाणे यंदाही मानाच्या तीन गणपतींना मानाचे ताट देण्यात आले. यामध्ये ग्रामदैवत, मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, ग्रामदेवता मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती आणि मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती यांचा समावेश आहे.
Read More