Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

सिनेकलाकार आणि कोरोनायोद्धांचा ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ठरत आहे सुपरहिट  

यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी वेगळा आणि विशेष ठरला आहे. प्रत्येकांच्या घराघरात आणि मंडळांत स्थानापन्न झालेले गणेश पर्यावरणपूरक तर आहेतच, पण त्या बरोबरच यंदाचा गणेशोत्सव आरोग्योत्सव म्हणूनदेखील साजरा होत आहे. पूजा इंटरेंटमेंट निर्मित ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ या नव्या स्वरूपातील आरतीला देखील गणेशभक्तांनी पसंती दिली आहे. सागरिका म्युझिकवर सादर होत असलेली ही आरती प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालण्यास यशस्वी होत आहे.

‘सुखकर्ता दुःखकर्ता’ ही बाप्पाची रॉक स्वरूपातील आरती अत्यावश्यक सेवेत दिवसरात्र आपली ड्युटी बजावणाऱ्या साऱ्या कोरोना योद्धांना समर्पित करण्यात आली आहे. संगीतकार आदित्य बर्वे ह्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या ह्या आरतीला आदित्य ऋषी केदार ह्या गप्पाटप्पा बँडने सांगितबद्ध केले आहे. विघ्नहर्त्याचा गजर करणा-या ह्या नव्या आरतीमध्ये दीपाली सय्यद. किशोरी शहाणे. विजय पाटकर, गौरव घाटणेकर, चिराग पाटील, विणा जगताप, ज्ञानदा रामतीर्थकर, मुग्धा परांजपे, अंगद म्हसकर, विघ्नेश जोशी, संदीप जुवटकर आणि उदय नेने या प्रसिद्ध कलाकारांबरोबरच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल, सफाई कामगार ते अगदी पत्रकारांपर्यंत प्रत्येकांचा समावेश आहे.
रील आणि रियल नायकांना एकत्र आणणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही नवीन आरती यंदाच्या गणेशोत्सवात लोकांच्या मनात नवे चैतन्य भरण्यास यशस्वी ठरत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading