Tuesday, June 16, 2026
PUNE

तब्बल १ कोटी हून अधिक गणेशक्तांनी ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे घेतले आॅनलाईन दर्शन

पुणे : गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नागरिकांना घरबसल्या दर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह सोशल मीडियावर तब्बल १ कोटी २७ लाख ८७ हजार गणेशभक्तांनी भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले आहे. ट्रस्टतर्फे सुरु झालेल्या उत्सव काळात व प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या काळात भारतासह परदेशातून लाखो गणेशभक्तांनी ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या आॅनलाईन सुविधांचा लाभ घेतला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी गणेशोत्सव सुरु आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने सुरु झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाईटवरुन दररोज २ लाख ५ हजार ८३३ हून अधिक भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाईटवरुन दररोज सकाळी व रात्री होणारी लाईव्ह आरती देखील हजारो गणेशभक्त पहात आहेत. तर, सुमारे ९५ लाख भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर ६ लाख ३२ हजार, यू ट्यूबवर २४ लाख आणि अ‍ॅपवरुन ५० हजार गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल १ कोटी २७ लाख ८७ हजारहून अधिक गणेशभक्तांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. आॅनलाईन अभिषेकाची नोंदणी करुन सुविधेचा लाभ घेतला. तर, डिजीटल माध्यमातून सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.
भारतातील मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, इंदोर, नागपूर, जयपूर, दिल्ली, चेन्नई, ठाणे, नवी मुंबई, कलकत्ता, नाशिक, सूरत, वडोदरा आदी शहरांमध्ये बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, आॅस्टेÑलिया, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड, ओमान, बेल्जियम, न्यूझिलंड, जपान, थायलंड, कतार, आर्यलंड, कुवेत आदी देशांतील गणेशभक्तांनी दगडूशेठ च्या श्रीं चे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, उत्सवकाळात दगडूशेठ गणपती मंदिर बंद राहणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते देखील मंदिरात दर्शनासाठी जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील मंदिराजवळ गर्दी करु नये. गणेशभक्तांनी घराबाहेर न पडता घरच्या घरीच श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

* तब्बल १ कोटी हून अधिक भाविकांनी घेतले आॅनलाईन दर्शन
१) फेसबुक – ९५,००,०००
२) वेबसाईट – २,०५,८३३
३) इन्स्टाग्रामवर – ६,३२,०००
४) यू टयूब – २४,००,०००
५) अ‍ॅप – ५०,०००

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading