पुण्यातील ५१ गणेश मंडळांचा ‘विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ’
शहरात विविध १६ ठिकाणी शिबीर ; सुमारे ७७३ बाटल्या रक्ताचे संकलन
पुणे : गणेशोत्सव आणि कार्यकर्ता हे नाते अतूट आहे. दरवर्षी विविध सामाजिक, मनोरंजन आणि धार्मिक कार्यक्रम राबवून हा उत्सव साजरा होतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी आरोग्योत्सव साजरा केला आहे. पुण्यातील ५१ गणेश मंडळांनी एकाच वेळी शहरातील विविध १६ ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित करीत सुमारे ७६३ बाटल्या रक्ताचे संकलन केले आहे. पुण्यातील ५१ मंडळाने एकत्र येऊन एक उपक्रम एकाच दिवशी एकाच वेळी राबिवला, हे प्रथमच घडले आहे.
बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर शाळेमध्ये सर्व मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आहे होते. यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात रक्त कमी न पडून देण्याची शपथ घेतली व आरोग्यसेवा देण्याचा संकल्प केला. रंगावलीच्या माध्यमातून व हातात फलक घेऊन रक्तदानाविषयी जनजागृती देखील करण्यात आली.
उपक्रमाकरिता पियुष शाह, शिरीष मोहिते ,राहुल कामठे, मयूर पोटे, अमित जाधव, अक्षय माळकर, जयेश पंडित, रोहित धावडे, किरण सोनिवाल, उमेश सपकाळ, प्रितम शिंदे, कुणाल पवार, नितीन शेंडगे, अमोल सारंगकर, रावी किरवे , पृथ्वीराज येलवंडे, विशाल धनवडे, हणू शिंदे, चेतन चव्हाण, गोपाल येमुल, सुनील मारणे, सागर माडचेट्टी व हर्षल परदेशी आदींनी परिश्रम घेतले.
श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, श्री गणेश मित्र मंडळ कोंढवा, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, काळ भैरवनाथ, पांगुळ आळी , पोटसुल्या मारुती, नवजवान मंडळ, नवज्योत मित्र मंडळ येरवडा, साईनाथ मंडळ व बालविकास मंडळ बुधवार पेठ, जगोबदादा तालीम मंडळ, वीर शिवराज मित्र मंडळ गुरुवार पेठ, हिंदमाता मंडळ, जय जवान, वीरा महाराणा , शिवशक्ती मंडळ नाना पेठ, वीर मारुती मंडळ शनिवार पेठ, सुभाष, चक्रवती अशोक व तरुण अशोक मंडळ बुधवार पेठ, आनंद तरुण मंडळ शनिवार पेठ, महाराष्ट्र तरुण मंडळ, सुर्यमुखी मित्र मंडळ, माती गणपती मंडळ, नवनीत मंडळ व मुठेश्वर मंडळ नारायण पेठ, पंचरातनेश्वर मित्र मंडळ धनकवडी यांसह अनेक मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला.
फोटो ओळ – पुण्यातील ५१ गणेश मंडळांनी एकाच वेळी शहरातील विविध १६ ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित करीत सुमारे ७६३ बाटल्या रक्ताचे संकलन केले आहे. बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर शाळेमध्ये सर्व मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आहे होते. यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात रक्त कमी न पडून देण्याची शपथ घेतली व आरोग्यसेवा देण्याचा संकल्प केला. रंगावलीच्या माध्यमातून व हातात फलक घेऊन रक्तदानाविषयी जनजागृती देखील करण्यात आली.
