Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज तब्बल १६ हजार ४०८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह , २९६ जणांचा मृत्यू

पुण्यात १६५८ पॉझिटिव्ह तर ४९ जणांचा मृत्यू

मुंबई, दि.३०: राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३  हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १६,४०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२३७ (३०), ठाणे- २३४ (९), ठाणे मनपा-२२८ (३), नवी मुंबई मनपा-४८८ (१), कल्याण डोंबिवली मनपा-३६६ (१४), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-१२, मीरा भाईंदर मनपा-१२० (१), पालघर-१५८ (८), वसई-विरार मनपा-१३१ (६), रायगड-३२२ (३),पनवेल मनपा-२३९ (२), नाशिक-३२५ (५), नाशिक मनपा-१०४९, मालेगाव मनपा-६३ (१), अहमदनगर-२८३ (७),अहमदनगर मनपा-१८७  (२), धुळे-८९ (२), धुळे मनपा-६९ (१), जळगाव- ६२५ (१०), जळगाव मनपा-१३०, नंदूरबार-२९ (५), पुणे- ९९१ (१२), पुणे मनपा-१६६३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-१०७२ (२), सोलापूर-३४५ (६), सोलापूर मनपा-४८, सातारा-६१६ (५), कोल्हापूर-६६९ (१६), कोल्हापूर मनपा-३०५ (१२), सांगली-३९३ (६), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९७ (१२), सिंधुदूर्ग-४८, रत्नागिरी-१६३ (५), औरंगाबाद-६३ (२),औरंगाबाद मनपा-५८ (४), जालना-६७, हिंगोली-१०, परभणी-४२, परभणी मनपा-२५ (४), लातूर-१५४ (३), लातूर मनपा-११५ (३), उस्मानाबाद-१०८ (२),बीड-१०४ (३), नांदेड-१८३ (४), नांदेड मनपा-१२८ (१), अकोला-२९ (२), अकोला मनपा-५२ (१), अमरावती-२८ (३), अमरावती मनपा-८६ (३) , यवतमाळ-९५ (१), बुलढाणा-४४, वाशिम-६३ , नागपूर-२२३ (५), नागपूर मनपा-८३६ (४०), वर्धा-६६, भंडारा-१०९, गोंदिया-४८, चंद्रपूर-११२, चंद्रपूर मनपा-१६४, गडचिरोली-७५, इतर राज्य १७ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

#Pune#PMC#Corona#Update पुणे – दिवसभरात १६५८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात १५०२ रुग्णांना डिस्चार्ज.- पुण्यात ४९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १४ रूग्ण पुण्याबाहेरील.- ८३३  क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५०७ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ९४४९७.- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५५४४.- एकूण मृत्यू -२२६७.-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ७६६८६.- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५७१३.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading