Thursday, June 18, 2026
Business

अ‍ॅमवे इंडियाने हेल्दी कुकिंग कम्युनिटी तयार करुन उत्सवाचा उत्साह वाढवला

मुंबई, 27 – निरोगी जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याच्या प्रयत्नात, देशातील आघाडीच्या एफएमसीजी थेट विक्री कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमवे इंडियाने गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यावर्षी, अ‍ॅमवे इंडियाने गणेशोत्सवाच्या भावभक्तीच्या स्मरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत 2000 पेक्षा अधिक थेट विक्रेत्यांना आणि त्यांच्या ग्राहकांना सहभागी करून घेत इंटरॅक्टीव्ह व्हर्चुअल कुकआउट सेशनचे आयोजन केले आहे. ऑनलाइन समुदायांचा उदय हा अलीकडील एक आश्चर्यकारक ट्रेंड आहे ज्यायोगे लोक सामाजिक अंतर राखून सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी एकत्र येवू शकत आहेत. लोक आगामी सणासुदीसाठी तयारीत असताना, अ‍ॅमवे इंडियाने सामुदायिक बांधकामाची भावना वाढविताना, निरोगी व पौष्टिक खाण्याच्या महत्त्वावर पुन्हा भर देण्यावर, थेट विक्रेते आणि त्यांच्या ग्राहकांसाठी उत्सव संस्मरणीय बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या उपक्रमाबद्दल टिप्पणी देतानापश्चिमअ‍ॅमवे इंडियाचे प्रादेशिक प्रमुख देबाशिश मजूमदार म्हणाले, “आज आरोग्य आणि स्वास्थ्य हे इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. पोषण आणि अन्नाकडे पाहण्याचा ग्राहकांच्या दृष्टिकोनामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे कारण ते तंदुरुस्त राहण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. यामुळे हेल्दी कुकिंग करण्याबाबत सामाजिक कम्युनिटी देखील तयार होत आहे. यावर्षीलोक उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमले नसले तरीहीघरी-बनवलेले पदार्थ आणि खाद्यपदार्थांवरील नवनवीन प्रयोगात वाढ दिसून आली आहे. लोकांना आरोग्यासाठीनिरोगी आयुष्यासाठी मदत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे पालन करतआम्ही कम्युनिटी तयार करीत आहोत, जे निरोगी जीवनावरील, शरीराच्या पौष्टिकतेच्या गरजेसह संतुलित आहाराचे फायदे यांवरील ज्ञानाचे आदानप्रदान करतील. . या अनुरुप आम्ही अ‍ॅमवे इंडिया येथे आमचे थेट विक्रेते आणि त्यांचे ग्राहक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘स्वादिष्ट’ अनुभव निर्माण करण्यासाठी आणि अशा प्रकारे आकर्षक उत्पादनांचा अनुभव विकसित करण्यासाठी अशा संधींचा उपयोग करण्यासाठी या अनोख्या उपक्रमाची कल्पना केली आहे.

आरोग्यदायी खाण्याच्या निवडीला मान्यता देण्याच्या उद्देशाने, अ‍ॅमवे इंडियाने वर्च्युअल कूकआउट सेशन आयोजित केले आहे – सेलिब्रिटी शेफ संजय पवार यांच्यासमवेत, ज्याने अ‍ॅमवे क्वीन कुकवेअरचा वापर करुन अ‍ॅमवेच्या न्यूट्रॅलाइट ऑल प्लांट प्रोटीनसह प्रसाद बनविण्याचे वेगवान व सुलभ मार्ग सामायिक केले आहेत. अ‍ॅमवे क्वीन कुकवेअर त्याच्या अद्वितीय VITALOK ™ आणि OPTITEMP ™ तंत्रज्ञानासह, अन्नाची चव आणि पोषण टिकवून ठेवण्यास मदत करते आणि जवळजवळ शून्य तेलाच्या वापरासह पाककलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करते. या सत्राने पुढच्या स्तराचे स्टेज सेट केले आहे, ज्यामध्ये पुढच्या दिवशी सहभागींनी न्यूट्रिलाईट ऑल प्लांट प्रोटीन वापरुन, पारंपारिक मोदक आणि लाडू बनविण्यासाठी, हेल्दी कुकिंग आणि चव यांचा संयोग साधायचे होते. न्यूट्रिलाईट ऑल प्लांट प्रोटीन आणि अ‍ॅमवे क्वीन कुकवेअर यांनी अचूक संयोजन केले आहे की ज्याने लोकांच्या आरोग्याशी तडजोड न करता आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रथिने घेण्याची खात्री करून त्यांच्या आवडत्या पारंपारिक मिष्टान्नांची मेजवानी बनवू शकतात. स्पर्धेचा एक भाग म्हणून, सहभागींनी त्यांच्या पाककृतींमध्ये पोषण सामग्री असलेल्या घटकांबद्दलचा तपशील देखील हायलाइट केला आणि उत्कृष्ट पाककृतींनी अ‍ॅमवे इंडिया कडून आकर्षक बक्षिसे जिंकली.

अलीकडेचअ‍ॅमवे इंडियाने थेट विक्रेते आणि त्यांच्या ग्राहकांच्या सामायिक आवडीवर आधारित कम्युनिटी तयार करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रम हाती घेतले आहेत. या कम्युनिटी अ‍ॅमवे थेट विक्रेत्यांना संवादाच्या पारंपारिक मार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात एक प्रभावी भूमिका निभावतात आणि सोशल मीडियाचा एक मंच म्हणून सामायिक रूचीवर आधारित परस्पर संबध ठेवतात. या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनअ‍ॅमवे इंडियाने अलीकडेच एक विशेष डिजिटल आरोग्य आणि स्वास्थ्य महोत्सव आयोजित करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. योग आणि सुरक्षित आहार अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारा हा उपक्रम शारीरिक आणि मानसिक आरोग्यास उत्तेजन देण्यासाठी उपयुक्त आहे. निरोगी जीवनशैलीतंदुरुस्तीसंतुलित आहाराचे महत्त्व आणि विविध गुंतवून ठेवणाऱ्या क्रियाकलापांद्वारे पूरक आहार याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी या कंपनीने ‘फिट है तो हिट है’ ही पहिली व्हर्चुअल तंदुरुस्ती मालिका देखील सुरू केली. डिजिटलायझेशनच्या लाटेवर स्वार होवून अ‍ॅमवेने या उपक्रमांना व्हर्चुअल बनवून आणि मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांचे प्रयत्न वाढविले आहेत.

अ‍ॅमवे न्यूट्रिलाईट हे पूरकतेसाठी वनस्पती-आधारित दृष्टिकोनानुसार 80 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा मजबूत वारसा असलेले जगातील 1 क्रमांकाची जीवनसत्त्वे आणि आहारातील पूरक आहार आहे. न्यूट्रिलाईट पूरक आहार श्रेणी विशेषतः शहरी भारतीयांना मदत करण्यासाठी तयार केली गेली आहे, ज्यांना निरोगी रहायचे आहे, परंतु बहुतेक वेळेस नकळत त्यांच्या पौष्टिकतेच्या दैनंदिन आवश्यक गरजा पूर्ण होत नाहीत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading