माँडेलीझ इंडियाने बॉर्नविटा फिल्सच्या सादरीकरणासह मॉर्निंग स्नॅकिंग विभागात उपस्थिती वाढवली
माँडेलीझ इंडिया या कॅडबरी डेअरी मिल्क, बॉर्नविटा, ओरिओ इत्यादी भारताच्या काही आवडत्या स्नॅकिंग ब्रॅण्ड्सच्या उत्पादक व बेकर्स कंपनीने आज घोषणा केली की, कंपनी बॉर्नविटा फिल्सच्या सादरीकरणासह मॉर्निंग स्नॅकिंग विभागातील त्यांची उपस्थिती अधिक दृढ करणार आहे. कंपनी बॉर्नविटा बिस्किट्समध्ये आणखी एक सादरीकरणासह मॉर्निंग स्नॅकिंग क्षेत्रातील त्यांचा वारसा व सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅण्ड ‘बॉर्नविटा’ला अधिक विस्तारित करत आहे. बॉर्नविटाचा हा नाविन्यपूर्ण नवीन अवतार सकाळच्या वेळी सेवन केला जाणारा पौष्टिक स्नॅक आहे. हा स्नॅक बॉर्नविटाच्या शक्तिशाली हाडे, शक्तिशाली स्नायू व मेंदू सक्रिय करण्याच्या पौष्टिक लाभांनी युक्त आहे. तसेच हा स्नॅक देशवासीयांच्या सकाळच्या वेळी स्नॅकिंग गरजांची देखील पूर्तता करतो.
या सादरीकरणाबाबत बोलताना माँडेलीझ इंटरनॅशनलचे भारतातील अध्यक्ष दीपक अय्यर म्हणाले, ”७० वर्षांहून अधिक काळापासून आमच्या उत्पादनांनी भावनिक व कार्यक्षम पातळीवर ग्राहकांना आनंद दिला आहे. बॉर्नविटाने ग्राहकांच्या जीवनांमध्ये महत्त्वाची व विश्वसनीय भूमिका बजावण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे. काही वर्षांपूर्वी ब्रॅण्डने बॉर्नविटा बिस्किटांच्या सादरीकरणासह मॉर्निंग स्नॅकिंग विभागामध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला. आज याच धोरणाचा भाग म्हणून ब्रॅण्ड बॉर्नविटा फिल्सच्या सादरीकरणाच्या माध्यमातून मॉर्निंग स्नॅकिंग विभागातील उपस्थिती अधिक दृढ करत आहे. सुलभपणे सेवन करता येणारे हे पौष्टिक स्नॅक्स दूधासोबत किंवा दूधाशिवाय सेवन करता येऊ शकतात. आम्हाला या उत्पादनाच्या माध्यमातून विकासाची प्रचंड संधी दिसत आहे. आम्ही हे उत्पादन आमच्या ग्राहकांच्या जीवनांमध्ये बजावणा-या भूमिकेबाबत जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहोत.”
माँडेलीझ इंडियाच्या विपणन विभागाचे (गम्स, कँडीज, बेव्हरेजेस् अॅण्ड मील्स) सहयोगी संचालक इंदरप्रीत सिंग म्हणाले, ”बॉर्नविटा हा ७० वर्षांहून अधिक काळापासून भारतीयांचा सर्वात विश्वसनीय ब्रॅण्ड राहिला आहे. या ब्रॅण्डने ऑफरिंग्जच्या रेंजच्या माध्यमातून देशवासीयांच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे. ब्रॅण्डची इक्विटी व विश्वासाला अधिक दृढ करत बॉर्नविटा फिल्स हे आणखी एक पौष्टिक उत्पादन आहे. हे उत्पादन विशेषत: ग्राहक आरोग्यदायी स्नॅकिंग पर्यायांना अधिक प्रमाणात प्राधान्य देत असलेल्या आजच्या काळामध्ये पौष्टिक संयोजन व स्वादिष्ट चवीच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांच्या जीवनामध्ये मूल्याची भर करेल.”
बॉर्नविटा फिल्ससह कंपनी ग्राहकांना अधिक निवड देण्यासोबत योग्य स्नॅकचे सेवन करण्यासाठी सक्षम देखील करत आहे. यामधून कंपनीची योग्य क्षणासाठी योग्य पद्धतीने बनवण्यात आलेल्या योग्य स्नॅकचे सेवन करण्याचे मिशन सार्थ ठरते. भारताचा सर्वात आवडता व विश्वसनीय ब्रॅण्ड बॉर्नविटाच्या ७० वर्षाच्या वारसाला पुढे घेऊन जात माँडेलीझ इंडियाचा अशा ऑफरिंग्ज सादर करत आणि त्यांच्या प्रगतीशील स्नॅकिंग पोर्टफोलिओमध्ये अधिक भर करत नाविन्यतेला चालना देण्याचा मनसुबा आहे.
या सादरीकरणाला नवीन उत्पादनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उच्चस्तरीय एकीकृत विपणन मोहिमेचे पाठबळ मिळेल. बॉर्नविटा फिल्सची किंमत लहान पॅकसाठी (१८ ग्रॅम) १० रूपये आणि मोठ्या पॅकसाठी (२५० ग्रॅम) १७० रूपये आहे. हे उत्पादन सुरूवातीला आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आगामी महिन्यांमध्ये भारतभरात सादर करण्यात येईल.
