विरुष्का ने दिली गुड न्यूज
क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोडींमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बुधवारी गुड न्यूज दिली. विराट कोहली याने आपल्या अधिकृट हँडलवर दोघांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर ‘And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️ ‘ अशी टॅग लाईनही दिली आहे. विराटच्या ट्वीटवर अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.
11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत विराट-अनुष्काच्या लग्नाचा शाही सोहळा रंगला होता. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. सेलिब्रिटी कपलमध्ये या जोडीची सर्वाधिक चर्चा होते.
