Monday, June 22, 2026
ENTERTAINMENT

…तर ‘सुर्यवंशी’ आणि ’83’ येऊ शकतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर

चित्रपट, मालिकांच्या शूटिंगला सुरूवात झाली असली तरी अद्याप थिएटर मात्र बंदच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थिएटरमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात आले तरी केंद्र सरकारने अद्याप थिएटर सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. लॉकडाऊनदरम्यान आपले नुकसान टाळण्यासाठी अनेक निर्मात्यांनी ओटीटीचा पर्याय निवडला आहे. मात्र ‘83’ आणि ‘सूर्यवंशी’ हे चित्रपट थिएटर सुरू झाल्यावरच रिलीज होणार असा निर्णय यापूर्कीच निर्मात्यांनी घेतलेला आहे. परंतु दिवाळीपर्यंत थिएटर सुरू झाले नाहीत तर नाईलाजाने हे दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावे लागतील, असे संकेत नुकतेच निर्मात्यांनी दिले आहेत.

‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ ची निर्माता कंपनी रिलायन्स एंटटेन्मेंटने ट्किट केलंय की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची परिस्थिती नक्कीच सुधारेल. बहुप्रतीक्षित ‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ चित्रपटांच्या प्रदर्शनापर्यंत नक्कीच परिस्थितीत सुधारणा होईल. त्यानंतर अनुक्रमे दिवाळी आणि नाताळच्या दिवसांत हे सिनेमा प्रदर्शित करता येईल.

ओटीटीवरील सिनेमांच्या प्रदर्शनाची सुरुवात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांच्या गुलाबो-सिताबो पासून झाली. यानंतर शकुंतला देवी, लूटकेस, खुदा हाफिज, दिल बेचारा, गुंजन सक्सेना हे सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. या किंवा पुढच्या महिन्यांत सडक 2, लक्ष्मी बम, भुज आणि द बिग बुल यासांरखे सिनेमा ओटीटीवर येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading