अथर्वशीर्ष पठणातून महिलांनी केले गणरायाला नमन
पुणे : ‘ओम नमस्ते गणपतये… गजानना, गजानना…ओम गं गणपतये नम:.. मोरया, मोरया…’ च्या जयघोषाने मॅजेस्टिक व्हेनिस या धायरी येथील गृहप्रकल्पामधील महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. श्री गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.
व्हेनिस उत्सव समितीतर्फे व्हेनिस – श्री गणेशोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात योग्य सामाजिक अंतर ठेवून व मास्कचा वापर करून सहभागी महिलांनी कोरोना संदर्भात सामाजिक सुरक्षिततेचा संदेश दिला.
यावेळी नगरसेविका वैशाली पोकळे यांचा व्हेनिस मॅनेजमेंट समितीतर्फे आशिष दहिफळे व सचिव अंजली कलंत्रे यांनी सत्कार केला. उत्सव समितीच्या प्रयत्नांनी सामाजिक अंतर ठेवून व मास्कचा वापर करून हा कार्यक्रम सुरक्षितरीत्या पार पडेल याचीही दक्षता यावेळी घेण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत योग्यप्रकारे पार पाडल्याने व्हेनिस उत्सव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष संतोष तरटे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व महिलांचे आभार मानले.
