fbpx
Friday, April 19, 2024
PUNETOP NEWS

येरवड्यातील शेतकरी पुतळ्यासाठी एकमत आवश्यक- महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. 24 – येरवड्याची ओळख म्हणून पुणे शहरासह सर्वदूर प्रसिद्ध असणाऱ्या ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याचा पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी येरवडा कृती समितीसह सर्वांनी एकमत करावे. सर्वानुमते होणार या निर्णयावर महापालिकेच्या वतीने योग्य जागा निवडून पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात येईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मागील आठवड्यात महा मेट्रो कडून ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याचा पुतळा परवानगीशिवाय काढण्यात आला. पुतळा काढताना शिल्पाची मोडतोड झाली. याप्रकरणी येरवडा कृती समिती, समस्त गावकरी मंडळ यांच्यासह भारतीय जनता पक्ष व विविध संघटनांच्या वतीने ऐतिहासिक पुतळ्याची सुस्थित पुनर्स्थापना करण्याची मागणी महापौर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्या करिता महापौरांनी महापालिका पथ विभाग व मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह पर्णकुटी चौकातील जागेची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, ए आय एम एम च्या गटनेत्या अश्विनी लांडगे, नगरसेवक अविनाश साळवे, माजी उपमहापौर नंदू मोझे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप (बाबा) धुमाळ,येरवडा नागरी कृती समितीचे निखिल गायकवाड, शैलेश राजगुरू, रुपेश घोलप, धनंजय बाराथे, सुहास कांबळे, समस्त गावकरी मंडळाचे सुहास राजगुरू, भाजपा उपाध्यक्ष संतोष राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे, शैलेंद्र भोसले यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील आठवड्यात मेट्रोच्या कामासाठी ऐतिहासिक शेतकरी दाम्पत्याचा पुतळा महापालिकेसह कोणत्याच खात्याची परवानगी न घेता काढण्यात आला. यावेळी पुतळ्याच्या मूळ शिल्पाची नासधूस व मोडतोड झाली. याप्रकरणी येरवडा नागरी कृती समिती व समस्त गावकरी मंडळ यांच्यावतीने दोषींवर कारवाई करत पुतळा सुस्थितीत योग्य ठिकाणी बसविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. मेट्रो कडून पुतळा स्थलांतरित करताना पर्याय योग्य जागा नियमानुसार निवडणे आवश्यक होते. तसेच त्यासाठी जागा निश्चिती सह सर्व परवानग्या घेणे देखील आवश्यक होते. मेट्रो कडून झालेल्या चुकीमुळे ही सर्व परिस्थिती उद्भवली. मेट्रो कडून नियमानुसार पुतळ्याचे स्थलांतरण केले असते तर ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली नसती. महापालिका प्रशासनाकडून देखील या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. सदरचा इतिहासिक पुतळा योग्य ठिकाणी सुस्थितीत पुनर्स्थापित करण्यासाठी येरवडा कृती समिती व परिसरातील इतर एकमत करावे त्यानुसार लवकरात लवकर या ठिकाणी पुतळा बसवणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

येरवडयातील राजीव गांधी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा- येरवडा नागरीक कृती समितीची मागणी
येरवड्यातील पुणे महापालिकेचे राजीव गांधी रुग्णालय पुणे महापालिकेने सर्व सोयीसुविधांनी पूर्ण क्षमतेने सुरू करावे अशी मागणी येरवडा नागरीक कृती समितीच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. कोरोना या महाभयंकर आजाराच्या संकटामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेची बिकट परीस्थिती सर्वांच्या समोर आलेली आहे. करण्यासाठी शासनाच्या वतीने जम्बो रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे. मात्र त्याच वेळी महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय यासारखी सुसज्ज वास्तू वापराविना पडून आहे. 2007 साली या रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून वापर सुरू करण्यात आला. या भव्य रुग्णालयातील दोन मजले विनावापर पडून आहेत. कोरोना व्यतीरिक्त इतर रुग्णांसाठी आवश्यक सर्व उपचार, शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग ऑक्सिजनबेड, व्हेंटिलेटरसह उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, वडगावशेरी, खराडी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून देता येतील. तसेच त्यामुळे ससून व इतर शासकीय रुग्णालयांवर येणारा अतिरिक्त ताण देखील कमी होण्यासाठी मदत होईल. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, स्थानिक आमदार सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांना देखील या मागणीचे निवेदन देण्यात आलेले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि राजीव गांधी रुग्णालयाची तात्काळ पाहणी केली. तसेच या महत्त्वपूर्ण विषयासाठी येरवडा नागरिक कृती समितीचा मागणीवरून प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading