Wednesday, June 17, 2026
PUNE

मंडईच्या शारदा गजाननाचा गणेशोत्सव यंदा साधेपणाने


पुणे : अखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.  व गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक २२ आॅगस्ट  रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
आॅनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे. 
महाराष्ट्रभरातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे उत्सवकाळात  २४ तास आॅनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या akhilmandaimandal.in या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी उत्साहात आणि सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेऊन अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत असतो. १२७ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. परंतु गणेशोत्सव हा समाजासाठी आहे. समाजातील लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आम्ही गणेशोत्सव साजरा करणार आहोत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading