fbpx
Friday, April 19, 2024
Business

एचसीसीबीने कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी डिझाइन केले कस्टमाइझ्ड व्हर्च्युअल एंगेजमेंट कार्यक्रम

एचसीसीबी या भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने सध्या चाललेल्या साथीच्या काळात आपल्या मनुष्यबळाचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी आणि त्यांना दीर्घकाळ अशा परिस्थितीत काम करण्यास सज्ज करण्यासाठी  अनेकविध व्हर्च्युअल कर्मचारी संवाद उपक्रम आणले आहेत.  कंपनीचे कर्मचारी अनेक भौगोलिक प्रदेशांत विखुरलेले आहेत तसेच दूरस्थ ठिकाणीही आहेत, त्यामुळे एचसीसीबीने या कर्मचा-यांशी संवाद साधण्यासाठी कस्टमाइझ्ड ऑनलाइन कार्यक्रम डिझाइन केले आहेत. सध्याच्या साथीमुळे भौतिक निकटता शक्य नसल्याने एचसीसीबी कर्मचारी कामाच्या नवीन मार्गांशी जुळवून घेत आहेत. अशा परिस्थितीत हे व्हर्च्युअल कर्मचारी संवाद कार्यक्रम कर्मचा-यांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत.

घरातून काम करणारे कर्मचारी, कारखाने व डेपोंमधील कर्मचारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणारी विक्री पथके यांच्यासाठी डिझाइन करण्यात आलेले व्हर्च्युअल संवाद कार्यक्रम आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी घेतले जातात. उदाहरणार्थ, ‘द लर्निंग अवर’मध्ये वेबिनार्स आणि डिजिटल उपक्रमांचा समावेश असून, कर्मचा-यांना नवीन माहिती व ज्ञान प्राप्त करण्यात मदत करण्याच्या उद्दिष्टाने, दर बुधवारी आणि शुक्रवारी गटांमध्ये किंवा जोड्यांमध्ये हा उपक्रम घेतला जातो; ‘द वेलनेस अवर’ या दर गुरुवारी होणा-या कार्यक्रमात कर्मचा-यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करणारी ऑनलाइन सत्रे तज्ज्ञांद्वारे घेतली जातात; ‘द टॉक शोज’ हे अनौपचारिक सत्र कामाचे तास संपल्यानंतर घेतले जाते, यामध्ये कर्मचारी संध्याकाळी पेयपानाच्या जोडीने मुक्त संभाषणात भाग घेऊ शकतात व समान आवडीच्या विषयांवर चर्चा करू शकतात, ही सत्रे एकाआडएक येणा-या शुक्रवारी संध्याकाळी कामाचे तास संपल्यानंतर घेतली जातात. याशिवाय कंपनीची हॅपीनेस टीम घरून काम करणा-या कर्मचा-यां साठी नेहमीच व्हर्च्युअल टॅलंट शोज घेत राहते. 

याशिवाय एचसीसीबी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी  व्हर्च्युअल ट्रेनिंग सेशन्स घेत आहे. तर या सत्रांचे उद्दिष्ट कर्मचायांना विविध क्षेत्रांतील नवीन कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हे आहे. यामुळे कर्मचा-यांना कंपनीशी जोडलेले राहण्याचे, शिकण्याचे व विकासाचे व्यासपीठ मिळते. वेबिनार्सशिवाय एकूण २५,००० प्रशिक्षण तासिकांमध्ये, हार्वर्ड मॅनेज मेंटॉर या जगातील सर्वोत्तम ऑनलाइन लर्निंग पोर्टलचा तसेच कर्मचा-यांना हवे असलेले करिअर व त्यासाठी आवश्यक कौशल्ये यांच्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आलेल्या लिंक्डइन लर्निंग या आणखी एका पोर्टलचा समावेशही  आहे.

एचसीसीबीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य मनुष्यबळ अधिकारी  इंद्रजित सेनगुप्ता वेगवेगळे कर्मचारी संवाद कार्यक्रम डिझाइन करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना म्हणाले,  “कर्मचा-यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची आम्हाला काळजी वाटत होती. बदलच्या कामाच्या परिस्थितीशी कर्मचा-यांनी भीती व चिंता सोडून वेगाने जुळवून घ्यावे अशी आमची इच्छा होती. आमच्या कर्मचाऱ्यांच्या आवडीचे विषय ध्यानात ठेवून हे कार्यक्रम डिझाइन करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना कामाचा ताण ताळण्यासाठी आवश्यक तो विरंगुळाही मिळू लागला. नियम म्हणून या सर्व कार्यक्रमात सहभागी होणे पर्यायी व ऐच्छिक आहे. त्यामुळे आमच्या कर्मचा-यांना आवश्यक ती लवचिकताही आम्ही दिली आहे.”

२१ जून, २०२० रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून एचसीसीबीने कर्मचा-यांना घरात राहून कुटुंबासोबत योगाभ्यास करण्यास प्रोत्साहन देणारी एक म्युझिक प्लेलिस्ट प्रसारित केली. डॉ. ईलियाराजा यांनी एचसीसीबीसाठी संगीतबद्ध केलेल्या गीतावर ही प्लेलिस्ट आधारित होती.

कर्मचारी दीर्घकाळ घरातून काम करत असताना त्यांचे कुटुंबीय ही त्यांच्यासाठी खरीखुरी सपोर्ट सिस्टम असते हे लक्षात घेऊन कुटुंबियांच्या योगदानाची दखल घेणारा कार्यक्रमही एचसीसीबीने सुरू केला आहे. उदाहरणार्थ, कंपनीने ‘इंकिंग विथ टिंकल’ ही एक ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली. यामध्ये लहान मुलांना टिंकल या भारतातील लहान मुलांसाठीच्या पाक्षिकाच्या ग्रुप आर्ट डायरेक्टर आणि प्रमुख संपादकांशी संवाद साधण्याची व त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली.

कंपनीने तंत्रज्ञानात्मक एकात्मीकरणाचाही फायदा करून घेत साथीच्या काळात कर्मचा-यांशी तत्काळ संवाद साधण्यासाठी नवीन चॅटबोट विकसित केली आहे. कर्मचा-यांच्या कोविड-१९शी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी कंपनीच्या इंट्रानेटवर एक वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे. कर्मचा-यांना त्यांचा डेली हेल्थ स्टेटस् अपडेट करता यावा तसेच गरज पडल्यास वैद्यकीय मदत किंवा समुपदेशन सुविधेची मागणी करता यावी यासाठी चॅटबोटवर एक विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

याशिवाय एचसीसीबीने व्हर्च्युअल टाउनहॉल्सचे वेगवेगळे विभाग तयार केले आहेत. यामध्ये केवळ कंपनीच्या सीईओ व वरिष्ठ अधिका-यांसोबतचा मासिक टाउनहॉलचाच नव्हे, तर कार्यात्मक, विभागीय व समूहाशी निगडित टाउनहॉल्सचाही समावेश होतो. एचसीसीबी त्रयस्थ सहयोगींच्या निवडक गटासोबत व्हर्च्युअल टाउनहॉल घेऊन सध्याच्या साथीच्या काळात मदतीचा विस्तार करण्याचा अनोखा प्रयत्नही करत आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षितता तसेच स्वास्थ्याबद्दल चिंता व्यक्त करणे, कंपनी कशी कामगिरी करत आहे याबद्दल स्पष्टता ठेवणे आणि कंपनीच्या व्यवसाय व्यूहरचना व दिशा सर्वांना सांगत राहणे हा टाउनहॉल्समागील उद्देश आहे. यामुळे कंपनी साथीच्या काळात बाजी मारणार आहे.

आपल्या कारखान्यातील सहयोगींसाठी एचसीसीबीने व्हर्च्युअल फॅमिली डे, म्युझिक सेशन्स आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून खेळता येतील असे तंबोला व हौजीसारखे गेम्स आयोजित केले आहेत. या गेम्सच्या विजेत्यांना मिळणा-या रकमेपैकी काही पीएम केअर फंडाला देणगी स्वरूपात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपल्या विक्री टीम्ससाठीही एचसीसीबी अनेक उपक्रम घेत आहे. यांमध्ये विक्रीसंदर्भातील कामगिरीची व्हर्च्युअल दखल घेण्याचा कार्यक्रम, पुरस्कार, उत्तेजन देणारे कार्यक्रम यांसह टॅलंट शोज घेतले जात आहेत. या उपक्रमांमुळे कारखान्यातील तसेच विक्री विभागातील कर्मचा-यांची एक वेगळीच बाजू बघायला मिळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading