१२०० कुटुंबांना आधार देण्यासाठी लीला पुनावाला फाउंडेशन आणि कॉग्निझंटची हातमिळवणी
पुणे, दि. १७ – पुण्यातील स्वयंसेवी संस्था लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) गरजू आणि हुशार मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करते. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या बिकट स्थिति मधे विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी पुढे येत एलपीएफने जगातील आघाडीच्या व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कॉग्निझंटबरोबर भागीदारी केली.
या उपक्रमांमध्ये पुणे शहर व ग्रामीण उपनगरामधील १४ शाळांमधील ६०० एलपीएफ विद्यार्थिनींच्यां कुटुंबासाठी महीनभराचा किराणा व स्वच्छता विषयक किटचा पुरवठा करण्यात आला. फाउंडेशनमधून शिक्षणासाठी सहायता प्राप्त करणाऱ्या या बहुतांश ग़रीब विद्यार्थिनीनींचे पालक रोजच्या रोजंदारीवर काम करणारे असतात ज्यांच्यावर करोनामुळे उद्भवलेल्या बेरोजगारीचा दुष्परिणाम झाला आहे.
“या विद्यार्थिनीनींच्या कुटुंबियांना गरजेच्या वेळी मदत करण्यात एलपीएफ नेहमीच आघाडीवर असते. कॉग्निझंटच्या समर्थनाद्वारे आम्ही ६०० हून अधिक एलपीएफ विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठबळ देऊ शकलो आहोत आणि या समर्थनाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, “असे एलपीएफचे संस्थापक विश्वस्त फिरोज पुनावाला म्हणाले.
कॉग्निझंटचे ग्लोबल हेड दीपक प्रभू मट्टी म्हणाले, “एलपीएफने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी या महामारी च्या काळात मदतीसाठी आखलेल्या मोहिमेचा भाग होण्याची संधी मिळाने ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. “शिक्षण बरोबरच मुलींच्या
सक्षमीकरणासाठी एलपीएफची वचनबद्धता, समुदाय विकासाचे लक्ष्य हे आमच्या ध्येयाशी सामायिक आहे .”
“एलपीएफ स्कॉलर अर्शिया म्हणाली, मी आणि माझे कुटुंब एलपीएफ आणि कॉग्निझंटचे आभारी आहोत की आम्हाला महिन्याभरासाठी अत्यावश्यक वस्तू देऊन आमची मदत केली . आणि माला खात्री आहे की आगामी काळात देखील आम्हाला नक्कीच मदत मिळेल . मला आशा आहे की पुढे देखील आणखी बर्याच संस्था गरजूना मदत करण्यासाठी पुढे येतील ” .
