fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

पुणे प्रादेशिक विभागातील 16 वीजयोद्धांसह उत्कृष्ट उपकेंद्र, डिजिटल कार्यालयांचा गौरव

पुणे, दि. 16 – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील 16 अभियंते, तांत्रिक कर्मचारी या कोरोना वीजयोद्धांसह उत्कृष्ट उपकेंद्र व डिजिटल शाखा कार्यालयांना पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव व निसर्ग चक्रीवादळाच्या खडतर परिस्थितीत अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडलनिहाय प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कोरोना वीजयोद्धा म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ग्राहकसेवा, वसुली व सुरळीत वीजपुरवठ्याच्या निकषानुसार परिमंडलनिहाय एक उपविभागीय कार्यालय, महावितरण पोर्टल व अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ काम करणाऱ्या डिजिटल शाखा कार्यालय आणि बिघाडरहित व आदर्शवत उत्कृष्ट उपकेंद्रांची देखील मंडलनिहाय प्रत्येकी एक अशी निवड करण्यात आली. प्रशासकीय सुधारणा, तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर, उत्कृष्ट ग्राहकसेवा यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक व मनोबल वाढविण्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयाने कर्मचारी व कार्यालयांच्या सन्मानाचा हा उपक्रम सुरु केला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्याहस्ते पुणे परिमंडलमधील कोरोना वीजयोद्धा शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह डिजिटल शाखा कार्यालय व उत्कष्ट उपकेंद्रांना मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. ‘वीजयोद्धांचा गौरव हा प्रातिनिधीक असून पुणे प्रादेशिक विभागातील सर्वच अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळाच्या खडतर परिस्थितीत चांगली कामगिरी बजावली आहे’, असे गौरवोद्गार काढत नाळे यांनी कौतुक केले. यावेळी अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, शंकर तायडे, पुनम रोकडे आदींची उपस्थिती होती. कोविड-19मुळे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व बारामती मंडलमधील कोरोना वीजयोद्धा व कार्यालयांना परिमंडल, मंडल कार्यालयांमध्ये गौरविण्यात आले.

पुणे प्रादेशिक विभागातील मंडलनिहाय कोरोना वीजयोद्धा पुढीलप्रमाणे: शाखा अभियंता / तांत्रिक कर्मचारी – विशाल नाईकनवरे / रोहित ढमाले (रास्तापेठ, पुणे), सन्नी टोपे / शेषनारायण फावडे (गणेशखिंड, पुणे), गणेश श्रीखंडे / गणेश लोखंडे (पुणे ग्रामीण), अमर कणसे / लक्ष्मण देबाजे (कोल्हापूर), अश्विनकुमारे बुचडे / गोविंद सागर (सांगली), रोहित राख / गोरख गावडे (बारामती), दत्तात्रय जरे / स्वप्निल जाधव (सातारा), हर्षवर्धन पाटील / आनंद कागदे (सोलापूर). तसेच मंडलनिहाय डिजिटल शाखा कार्यालय / उत्कृष्ट उपकेंद्र पुढीलप्रमाणे: गंगा व्हिलेज शाखा / ब्रम्हासन सिटी उपकेंद्र (रास्तापेठ, पुणे), शिवाजी हौसिंग शाखा / सुसगाव उपकेंद्र (गणेशखिंड, पुणे), आळंदी शहर शाखा / आळेफाटा उपकेंद्र (पुणे ग्रामीण), निगवे शाखा / नागाळा उपकेंद्र (कोल्हापूर), विटा शाखा 2 / कुमठे उपकेंद्र (सांगली), भाटघर शाखा / काटी उपकेंद्र (बारामती ग्रामीण), कोळेवाडी शाखा / सदर बझार उपकेंद्र सातारा (सातारा), नातेपुते शाखा 2 / अकोला उपकेंद्र (सोलापूर) परिमंडलनिहाय उत्कृष्ट उपविभागीय कार्यालय पुढीलप्रमाणे: वारजे उपविभाग (पुणे), बारामती शहर उपविभाग (बारामती), मिरज ग्रामीण 1 (सांगली).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading