स्वातंत्र्यदिनी गरजु नृत्य कलाकारांना किटचे वाटप
पुणे, दि. 16 – नृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेच्या वतीने पुणे शहरातील गरजु नृत्य कलाकारांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप खासदार गिरीष बापट व संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात कलावंतांवर ओढवलेल्या संकटसमयी मदत करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिराच्या प्राणंगणात करण्यात आला. खासदार गिरीष बापट यांनी कलावंतांच्या पाठीशी घट्ट उभे रणाण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवु असे प्रतिपादन केले. मेघराज राजे भोसले यांनी कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधुन शासनाने वृध्द तसेच गरजु कलाकारांची तातडीन दखल घ्यावी अशी विनंती आपल्या मनोगतामध्ये केली. पुण्यातील 135 नृत्य कलाकारांना या प्रसंगी किट तसेच चहापान देवून कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन परिषदेच्या वतीने जतिन पांडे, रत्नाकर शेळके, आशुतोष राठोड, दिपक रणदिवे, आणि सदस्यांनी केले या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधीर जवळेकर आणि मंदार घुले उपस्थित होते त्यांचा सन्मान करण्यात आला.
