fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

ग्रीनतारा कडून विद्यार्थिनींना अभ्यासासाठी मोबाईल भेट

पुणे, दि. १५ – कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. या परिस्थितीत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोबाइल नसल्यामुळे ऑनलाईन अभ्यास करणे शक्य नाही. यावर उपाययोजना म्हणून विश्रांतवाडी येथील ग्रीन तारा फाउंडेशनच्या वतीने पुणे महापालिकेच्या डॉ. नानासाहेब परुळेकर विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोबाईल संच उपलब्ध करून देण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रीन तारा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मंदा मुने, निर्भय प्रतिष्ठानचे संचालक निखिल गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोबाईल चे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता पवार, सहशिक्षिका नीलिमा गायकवाड, कल्पना चव्हाण, जगन्नाथ खंडवे उपस्थित होते.
प्रशालेतील दहावीच्या गुणवंत गरीब विद्यार्थिनी मधील संकेश्वरी लष्करे, विजया बोलम पल्ली, शितल शेलार, आचंल कांबळे, पूजा पवार, अंकिता कांबळे, श्रद्धा हाऊसमनी यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या शांतीनगर येरवडा येथील डॉ. नानासाहेब परुळेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या अतिशय गरीब घरातून असून त्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ग्रीन तारा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत केली जाते. प्रशालेतील विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी देखील त्यांच्याकडून मदत होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइल उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने ग्रीन तारा फाऊंडेशनचे आभार व्यक्त करण्यात आले. यंदा दहावी परीक्षेतील शाळेचा निकाल 97.3 62 टक्के लागला असून यामधील 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या दोन विद्यार्थिनी आहेत. अनुक्रमे 85 टक्के यांच्या पाच 80 टक्‍क्‍यांच्या सहा तर 70 टक्‍क्‍यांहून अधिक 28 विद्यार्थिनींनी गुण मिळवलेले आहेत. दहावी वर्गाच्या तीन तुकडया असून एक सेमी माध्यमाची तर दोन मराठी माध्यमांच्या तुकडया आहेत. मल्टी स्किलचा देखील एक वर्ग आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्याही स्वरूपाचा खासगी क्लास नसताना केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन इतर स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवत असल्याची माहिती मुख्याध्यापिका सविता पवार यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading