fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

कोरोना – राज्यात शनिवारी १२ हजार ६१४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; ३२२ जणांचा मृत्यू

पुण्यात १०७३ रुग्णांची वाढ, ३५ जणांचा मृत्यू

मुंबई, दि.१५ : राज्यात आज ६८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

पुणे कोरोना अपडेट १५ ऑगस्ट २०२०

 दिवसभरात १०७३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ११४५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ३५ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ७६० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४६६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ७२५७६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४६२१.
– एकूण मृत्यू -१७१०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ५६२४५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5840

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading