fbpx
Saturday, April 27, 2024
PUNE

खडकवासलाचे सर्व दरवाजे उघडले, भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

पुणे, दि. १४ – मागील दोन दिवस रात्रभर कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने या धरणाचे सर्व ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर भिडे पूल आणि नांदेड – शिवणे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, टेमघर , वरसगाव आणि पानशेत या चार धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊ लागला आहे. यातील खडकवासला धरण १००टक्के भरल्याने या धरणातून ५१३६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे सर्व११दरवाजे एक फुटांनी उघडले आहेत. या धरणातून २ हजार क्यूसेक वेगाने मुठा नदीत पाणी जात आहे.

चालू पावसाळी हंगामातील सर्वात जास्त पाणीसाठा खडकवासला धरणात आहे. काल या धरणाचे सुरुवातीला ६दरवाजे उघडले होते.पण पाणीसाठा आणखी वाढू लागल्याने सर्व ११दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. पानशेत धरणही ७५ टक्के , टेमघर ५५.३ टक्के आणि वरसगाव धरण साधारण ५८टक्के भरले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading