Monday, August 31, 2026
PUNE

‘कोरोना किलर’ इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापरासाठी सोमवारी मंत्रालयात बैठक

कौन्सिल हॉल मध्ये ‘कोरोना किलर’ चा वापर सुरु

पुणे, दि. 14 – आयनायझेशन च्या माध्यमातून कोरोना व्हायरस च्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणू पासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे सादरीकरण शुक्रवारी राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले कौन्सिल हॉल येथे झालेल्या बैठकीत इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रा.लि (पुणे)चे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी या उपकरणाची माहिती अजित पवार यांना दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत हे उपकरण कौन्सिल हॉल मध्ये बसविण्यात आले.यावेळी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल’ चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यावेळी उपस्थित होते.

‘सरकारी आस्थापनांमध्ये ‘कोरोना किलर’ उपकरण वापरण्याचा विचार करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य संचालकांसमवेत सोमवारी मंत्रालयात बैठक आयोजित करू.या उपकरणाच्या उपयुक्ततेविषयी अधिक चर्चा करण्यात येईल’,असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
आयनायझेशन च्या माध्यमातून कोरोना व्हायरस च्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणू पासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर’ या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे जुलै २०२० मध्ये कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले आहे .पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि.या कंपनीने संशोधित केलेले आणि अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण आहे,असे भाऊसाहेब जंजिरे यांनी यावेळी सांगितले.
‘कोरोना किलर’ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते. या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे मान्यता देण्यात आली आहे . तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. कोविड रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.
या आधी उद्योगमंत्री सुभाष देसाई ,तसेच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर या उपकरणाचे सादरीकरण झाले होते. राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयात विषाणूनाशक कोरोना किलर उपकरण बसविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading