fbpx
Sunday, May 26, 2024
PUNE

पुणे जिल्ह्यात एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल

स्वारगेट, वाकडेवाडी बस स्थानकातून वाहतूकीला सुरुवात
पुणे, दि. 9 – कोरोनामुळे दीर्घ कालावधीपासून बंद असलेली एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र ही प्रवासी वाहतूक जिल्ह्यातंर्गत आहे. स्वारगेट आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागात 15 मार्गांवर बस धावत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी तालुका ते जिल्हा व जिल्हा ते तालुका अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना ई-पासची आवश्यकता नाही, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्यात एसटीची सेवा 25 मार्चपासून बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यात टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागात एसटीची सेवा सुरू करण्यात आली. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरातून एसटीची सेवा बंदच होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी टप्याटप्याने बस सोडल्या जात आहेत. एसटीच्या पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, जुन्नर, नीरा, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, दौंड, पाटस, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पाबळ, घोडेगाव, अवसरी, भिगवण, मुळशी आदी मार्गावर सेवा सुरू होणार आहे. या गाड्यांसाठी नियमीत तिकीट दर आकारण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क अनिवार्य असणार आहे. तसेच, एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी बसू शकणार आहेत. अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading