छ. संभाजी महाराज यांचे सेवक व रामसेज किल्ल्याचे किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या जयंतीचे आयोजन
पुणे, दि. 8 – छत्रपती संभाजी महाराज यांचे सेवक व रामशेज किल्ल्याचे किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या 361 व्या जयंतीचे दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना (कोविड -१९ ) साथीच्या प्रादुर्भावामुळे व खबरदारीचे सर्व उपाययोजना करत वढू बुद्रुक (तालुका. शिरूर) येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज राजेंद्र गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या कार्यक्रमास नानासाहेब जाधव, गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज राजेंद्र गायकवाड, पांडुरंग गायकवाड ,अशोक नगरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाकडून झालेली झालेल्या क्रूर हत्येनंतर गोविंद गोपाळ गायकवाड यांनी औरंगजेबाच्या आदेशाला न जुमानता संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला होता. गोविंद गोपाळ गायकवाड यांच्यावरील पुस्तकाचे १९६७ साली महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक व विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी सिद्धप्पा मोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. गोविंद गोपाळ गायकवाड हे राष्ट्रपुरुष होते स्वराज्याची व छत्रपतींची गोविंद गोपाळ गायकवाड यांनी तहहयात सेवा केली .
या जयंतीनिमित्त रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती व विचारवंत बी जी कोळसे पाटील, लेखक अण्णा साहेब चव्हाण, इतिहास संशोधक प्रा श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, इतिहास संशोधक व सामाजिक कार्यकर्ते मा. म. देशमुख ,ज्येष्ठ लेखक व विचारवंत कॉम्रेड भीमराव बनसोड, ऍड . बी जी बनसोडे या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.