Monday, June 22, 2026
PUNE

SBI मध्ये होणार ५१७ अधिकाऱ्यांची मेगाभरती

पुणे, दि. ६ – भारतीय स्टेट बँकेतर्फे महाराष्ट्रातील तरुण उमेदवारांना स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण ५१७ जागांसाठी ही भरती होणार असून, उमेदवार किमान कोणत्या तरी एका शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. मंडळ आधारित अधिकारी किंवा ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ असे या पदाचे नाव असून, सहाय्यक प्रबंधक या श्रेणीत नियुक्तीसाठी ही भरती होत आहे, अशी माहिती बँकेचे उपमहाप्रबंधक व सीडीओ श्री. आलोक चतुर्वेदी यांनी दिली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळातही बँकेने दिलासा देणारी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्रातच अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. यासाठी ग्रामीण बँक अथवा शेड्युल कमर्शियल बँकेमध्ये दोन वर्षाचा अनुभव असलेल्या ३० वर्षाखालील मराठी तरुणांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२० असून, जास्तीत जास्त मराठी तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. पात्रतेचे निकष, आरक्षण, वेतन यासह अधिक माहितीसाठी https://www.sbi.co.in/careers किंवा https://bank.sbi/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन चतुर्वेदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading