Thursday, June 11, 2026
PUNE

बालकलाकारांनी वेशभूषेत येऊन केला रामनामाचा जयघोष

पुणे, दि. 5 – बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येत श्रीराम मंदिर भूमीपूजनानिमित्त पुण्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्यक्ष श्रीराम आणि रामाचे परमभक्त हनुमान यांच्या वेशभुषेत बालकलाकारांनी मंदिरात आगमन करीत प्रभू श्रीरामाचा जयघोष केला. 


फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तसेच रामकथेतील काही प्रसंग देखील कलाकारांनी सादर केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पीयुष शाह आणि प्रवीण वळवडेकडर, संकेत निंबाळकर, अमर राव, नरेंद्र व्यास, कुमार आणवेकर, प्रसाद भोयरेकर, प्रशांत पंडित, अमित दासनी, राजू शेडगे, मुकुल पाटणकर (राम), अवधूत साठे ( हामुमान), शुभम गोखले(  रावण), सारिका पाटणकर, वृषाली साठे, पुष्पा मांडे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading