Thursday, June 11, 2026
MAHARASHTRA

राज्यात आज १० हजार ३०९ नवीन कोरोना बाधित; तर ६ हजार १५६ कोरोनामुक्त

पुण्यात ११०१ पॉझिटिव्ह तर ११५९ कोरोनामुक्त

मुंबई, दि. ५ : राज्यात आज दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५  हजार ९६१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

आज निदान झालेले १०,३०९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३३४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२५ (४२), ठाणे- २३२ (४), ठाणे मनपा-२८१ (९),नवी मुंबई मनपा-२९० (४), कल्याण डोंबिवली मनपा-३७१ (२३),उल्हासनगर मनपा-३० (७), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (१८) , मीरा भाईंदर मनपा-१२५ (४),पालघर-११२ (२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-२८३ (१९), पनवेल मनपा-१७४ (१७), नाशिक-११९(१),नाशिक मनपा-५३५ (९), मालेगाव मनपा-५१, अहमदनगर-४२४ (३), अहमदनगर मनपा-२५०, धुळे-४, धुळे मनपा-४(२), जळगाव-३२३ (३), जळगाव मनपा-१४३ (१), नंदूरबार-१० (४), पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा-१२८२ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-७१४ (१४), सोलापूर-२५३ (९), सोलापूर मनपा-३८, सातारा-१९३ (३), कोल्हापूर-२६४ (१२), कोल्हापूर मनपा-१६६, सांगली-८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-११४ (६), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१), औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१), हिंगोली-४, परभणी-१४, परभणी मनपा-३०,लातूर-१३४(१), लातूर मनपा-१८ (२), उस्मानाबाद-१४२ (३), बीड-८९ (२) , नांदेड-१२२ (३), नांदेड मनपा-१८ (२), अकोला-२८, अकोला मनपा-४, अमरावती- २२ (१), अमरावती मनपा-२७, यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७, नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५), वर्धा-१० (३), भंडारा- ५,गोंदिया-४६, चंद्रपूर-३८, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

*पुणे शहर ..! ………- दिवसभरात 1101 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 1159 रुग्णांना डिस्चार्ज.
–  17 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
–  एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 60597

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 16758
– एकूण मृत्यू – 1429
– एकूण डिस्चार्ज- 42410

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading