Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENT

अक्षयकुमार चा ‘रक्षाबंधन’ 5 नोव्हेंबर 2021 रोजी होणार रिलिज

दिग्दर्शक आनंद एल राय आणि अभिनेता अक्षय कुमार या जोडीचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट येणार आहे. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘या चित्रपटाची कथा आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा या जोडीने लिहिली आहे. या चित्रपटाची घोषणा स्वतः आनंद एल राय आणि अक्षय कुमार यांनी केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. आनंद म्हणाले, ‘रक्षाबंधन’ हा आमचा आणखी एक चित्रपट आहे. याची कथा खूप खास आहे. हा नात्यांचा उत्सव आहे.’

अक्षय कुमार म्हणाला, “जीवनात अशी क्वचितच एखादी कहाणी असते जी आपल्या अंतःकरणाला इतक्या खोलवर आणि सहजपणे स्पर्श करते. ही कहाणी आपल्याला हसवेल आणि रडवेल. ज्यांना बहिणी आहेत ती व्यक्ती किती धन्य आहे, याचा अनुभव हा चित्रपट देईल. मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की माझी बहीण अलका दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासह या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.’

या चित्रपटामध्ये अक्षयच्या चार बहिणी असल्याचे ट्रेड पंडितांचे म्हणणे आहे. यात अक्षय आणि अलकाची रिअल लाइफ बॉन्डिंगदेखील दिसणार आहे. अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांनी या लॉकडाऊनमध्ये हा चित्रपट फायनल केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading