Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRA

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन

मुंबई, दि. ३ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे.

अनघा यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला होता. लग्नापूर्वी त्यांचे नाव मंगल हिगवे असे होते. १४ मे १९६४ साली मनोहर जोशी यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर त्या अनघा जोशी झाल्या. त्यांनी मनोहर यांना राजकीय व सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading