fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

राज्यात शनिवारी १० हजार ७२५ कोरोना मुक्त तर ९६०१ पॉझिटिव्ह रुग्ण; तब्बल ३६६ मृत्यू

एकाच दिवशी झाल्या ६४ हजार ८४५ चाचण्या – आरोग्यमंत्री

– पुण्यात १५०६ कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि.१: राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४९ हजार २१४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ९६०१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०४७ (४५), ठाणे- १९७ (१२), ठाणे मनपा-२२४ (७),नवी मुंबई मनपा-३४९ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२८३ (६),उल्हासनगर मनपा-४१ (४), भिवंडी निजामपूर मनपा-१९ (३) , मीरा भाईंदर मनपा-१०९(१),पालघर-१२९ (२), वसई-विरार मनपा-१८० (१२), रायगड-२७१ (२६), पनवेल मनपा-१४६(२), नाशिक-१३८ (६), नाशिक मनपा-३१८ (६), मालेगाव मनपा-२१ (१), अहमदनगर-२५६ (२),अहमदनगर मनपा-२३५ (४), धुळे-११ (२), धुळे मनपा-१९, जळगाव-१२४ (१७), जळगाव मनपा-१४९ (३), नंदूरबार-१३ (१), पुणे- ४६१ (२१), पुणे मनपा-१४४१ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-७९७ (१३), सोलापूर-१९८ (६), सोलापूर मनपा-२७ (१), सातारा-१९८ (६), कोल्हापूर-४९५ (४), कोल्हापूर मनपा-१११ (४), सांगली-७९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९५ (७), सिंधुदूर्ग-६, रत्नागिरी-४५ (२), औरंगाबाद-९३ (६), औरंगाबाद मनपा-२२ (११), जालना-२२ (१), हिंगोली-५ (१), परभणी-१३ , परभणी मनपा-१५, लातूर-११८ (४), लातूर मनपा-४९ (२), उस्मानाबाद-३३ (६), बीड-४९ (२), नांदेड-७८, नांदेड मनपा-८ (२), अकोला-३१ (१), अकोला मनपा-१४, अमरावती- ४० (२), अमरावती मनपा-१४१(२), यवतमाळ-१०१, बुलढाणा-८० (२), वाशिम-७ (१), नागपूर-२११ , नागपूर मनपा-१४१ (२), वर्धा-९, भंडारा-३, गोंदिया-२७, चंद्रपूर-३९, चंद्रपूर मनपा-१०, गडचिरोली-३, इतर राज्य ७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ९४ हजार ९४३ नमुन्यांपैकी ४ लाख ३१ हजार ७१९ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ०८ हजार ०९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

पुणे १ ॲागस्ट कोरोना अपडेट

– दिवसभरात १५०६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १७९१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ३४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ११ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ६३८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३८९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ५५७६१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७५१२.
– एकूण मृत्यू -१३३५.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ३६९१४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८६३.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading