fbpx
Monday, June 17, 2024
NATIONAL

खासदार अमरसिंह यांचे निधन

नवी दिल्ली, दि. 1 – भारताच्या राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक जगतात “अमर अकबर अँथोनी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिकूटातील खासदार अमर सिंह यांचे आज सिंगापूर येथील रुग्णालयात मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलीवूडमधील शहेनशहा अमिताभ बच्चन, राजकारणातील नेते अमरसिंग आणि उद्योग जगतातील उद्योगपती अनिल अंबानी हे त्रिकुट तब्बल पंधरा वर्ष एकत्र होते.

अमर सिंह हे उत्तर प्रदेश मधील एक मातब्बर नेते होते. त्याचप्रमाणे ते समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांचे खासम खास होते. समाजवादी पार्टीला उद्योग जगताच्या जवळ आणण्याचे आणि पार्टीला आधुनिक बनविण्याचे काम मुलायमसिंग यादव यांनी केले. अमिताभ बच्चन यांच्या पडत्या काळात अमर सिंह यांनी त्यांना साथ दिली होती. बच्चन कुटुंबाचे व त्यांचे घरोब्याचे संबंध होते. जया बच्चन यांना समाजवादी पार्टीचे खासदार बनविण्याचे काम अमरसिंह यांनी केले होते. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांनाही निवडणुकीच्या रणांगणात उतरून लोकसभेत खासदार म्हणून पाठविण्याचे कामही अमरसिंह यांनीच केले होते. 2013 साली त्यांच्यावर मूत्रपिंडाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही ते फारसे स्वस्थ वाटत नव्हते. अधून मधून सिंगापूरच्या रुग्णालयात जाऊन ते 1 -2 महिने उपचार घेऊन परत येत होते. मात्र यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर ते तब्बल सहा महिने सिंगापूरच्या रुग्णालयातच होते. तेथूनच ते भारताच्या राजकीय स्थितीवर आपले व्हिडिओ पाठवून मत व्यक्त करीत होते. मृत्यूसमयी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पंकजा आणि दोन जुळ्या मुली हजर होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading