जान्हवी कपूर ग्लोव्हज आणि मास्क घालूनच किचनमध्ये जाते
बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्या घरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे संपूर्ण परिवाराला क्वारंटाईन मध्ये राहण्याची वेळ आली आहे. . या संदर्भात बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पत्रक शेअर केलं होते. आता त्यापाठोपाठ त्यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांची आणि दोन्ही मुलींची काळजी घेत आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
यातच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने आपण सध्या कशी खबरदारी घेत आहोत हे सांगितलं आहे. जान्हवी म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये आम्हाला एकमेकांना वेळ देता येत होता त्यामुळे लॉकडाऊनचा आनंद आम्ही घेत होते. मात्र जेव्हा आमच्या घरात कोरोनाव्हायरसची तीन प्रकरणं सापडली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तेव्हापासून मी आता घरात विशेष खबरदारी घेते आहे. वडील आणि बहीण खुशीवर विशेष लक्ष ठेवते. आताही त्यांना रात्री गरम पाणी हवं असेल तर मी गरम पाणी आणण्यासाठी देखील ग्लोव्हज आणि मास्क घालूनच किचनमध्ये जाते. याची तशी गरज नाही मात्र तरी मी खबरदारी म्हणून असं करते. प्रत्येकाने गरम पाण्याची वाफ घ्यावी आणि गरम पाणी प्यावं, असं आवाहन मी करते”, असं जान्हवी म्हणाली’